पुणे विभागात एप्रिल आणि मे महिन्यात ‘महसूल लोकअदालत’; प्रलंबित खटले मार्गी लावण्याची संधी

पुणे (प्रतिनिधी), ता.३१ : महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियानांतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे सामोपचाराने सोडवण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

लोकअदालतीचे वेळापत्रक:

ही लोकअदालत अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता खालील तारखांना होईल. ४ एप्रिल २०२६, १८ एप्रिल २०२६, २ मे २०२६

सहभागी होण्यासाठी काय करावे?

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज लोकअदालतीच्या तारखेपूर्वी किमान एक आठवडा आधी सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत संबंधित सर्व पक्षकारांना लोकअदालतीत उपस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.

जिल्हानिहाय व्हॉट्सअॅप अर्ज सुविधा:

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यानुसार खालील व्हॉट्सअॅप क्रमांकांवर अर्ज पाठवता येतील.

सांगली आणि सातारा: ९५२७१६१७६३ पुणे: ९६०४३२८७१८सोलापूर आणि कोल्हापूर: ९७६७३९५६०८ पुणे,

सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे खटले विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहेत, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button