सांगली जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ७ एप्रिलला प्रसिद्ध १३

एप्रिलपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत; निवडणूक प्रक्रियेला वेग

सांगली (प्रतिनिधी) ५ एप्रिल २०२६ : सांगली जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना (नमुना-ब) मंगळवारी, ७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.जानेवारी

२०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) सतीश कदम यांनी दिली.

📍 प्रभाग रचना कुठे पाहता येईलनागरिकांच्या

माहितीसाठी ही प्रारूप प्रभाग रचना खालील ठिकाणी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. संबंधित ग्रामपंचायत कार्यालयतलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयतहसील कार्यालयपंचायत समिती कार्यालय

🕒 हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळ

प्रभाग रचनेवर कोणालाही काही हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास, त्यांनी त्या लेखी स्वरूपात संबंधित तहसीलदार यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०२६ पूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही

.⚖️ सुनावणीची प्रक्रियाप्राप्त झालेल्या हरकतींवर आवश्यकता भासल्यास, संबंधित उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या स्तरावर दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाईल.राज्य

शासनाच्या ग्राम विकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button