
सांगली मध्ये ओबीसी चा महाएल्गार मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात ओबीसी चे सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने आले.ओबीसी चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह प्रकाश आणा शेंडगे,गोपिचंद पडळकर ,आण्णा डांगे, संगीता खोत, विष्णू माने ,ओबीसी च्या म्होरक्या या नावाने ओळखले जाणारे लक्ष्मण हाके सर व ओबीसी चे सर्व समाजबांधव व मान्यवर यांच्या उपस्थितीने शांती पूर्वक पार पडला.
ओबीसी चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना निशाना साधला. मनोज जरांगे येत्या निवडणुकीला 288 जागा लढवणार आहेत. त्यातील फक्त 88 जागा लढवावेत व 88 मधील 8 जागा निवडून आणाव्यात हिंमत असेल तर मैदानात ये आणि लाअशी जोरदार टीका केली पुढे बोलताना भुजबळ म्हणाले जो ओबीसी च्या आरक्षणावर उठेल त्याला सोडायचे नाही.
सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणे शक्य नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण घ्या पण ओबीसी च्या आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही पाहिजे. आमचा तुमच्या आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीमधुन आरक्षण मिळावे या गोष्टीला आमचा विरोध आहे.