
मिरज: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे .त्यातीलच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्र शिवसेना नेते भास्कर जी जाधव साहेब सांगली सातारा संपर्कप्रमुख आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील सर व सांगली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते यांच्या आदेशाने मिरज शिवसेना तालुकाप्रमुख श्री संजय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भगवा सत्ता अभियान चालू करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती व मार्गदर्शन मुंबईवरून मिरज विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून श्री ज्ञानेश्वर कवळे साहेब यांच्या सूचना व सप्ताहाची माहिती देण्यात आली. शिवसेना मिरज विधानसभा नेते प्राध्यापक सिद्धार्थची जाधव साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले . विभाग प्रमुख विवेक चौगुले बेळंकी शाखाप्रमुख शितल पाटील उपविभाग प्रमुख सागर भोसले सलगर शाखाप्रमुख नंदकुमार जाधव चाबुकसरवाडी शाखाप्रमुख दत्ता अण्णा आटपाडकर जानराववाडी शाखाप्रमुख रामकृष्ण बिसरे शिपुर शाखाप्रमुख विजयकुमार बाबर व जिल्हा परिषद गटामधील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत मिरज विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवणारच असा निश्चय व्यक्त करण्यात आला ;तसेच यावेळी बोलताना श्री संजय काटे यांनी काही झालं तरी मिरज विधानसभेवर शिवसेनेचा आमदार होणारच आणि आम्ही सर्व पदाधिकारी शिवसैनिक ते करणारच असे ठणकावून सांगितले. उद्यापासून मालगाव जिल्हा परिषद बेडग जिल्हा परिषद भोसे जिल्हा परिषद आरग जिल्हा परिषद हा भगवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. असे संजय काटे यांनी सांगितले. मालगावचे शाखाप्रमुख अमोल जाधव, शिद्राय तांबट ,उपविभाग प्रमुख दिलीप तांबट हे देखील उपस्थित होते.