आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून बामणोलीमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

बामणोली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून बामणोली गावात एकूण ३ कोटी ८८ लाख रु. विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

ता.१० ऑगस्ट २०२४ सांगली विधानसभा क्षेत्रातील कोयना पुनर्वसन असलेले बामणोली या गावासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सुमारे ३ कोटी ८८ लाखाचा भरघोस निधी मंजूर करून आणला.

शुभारंभ प्रसंगी पॅनेल प्रमुख सुभाष आण्णा चिंचकर,सरपंच गिताताई चिंचकर,उपसरपंच विष्णू लवटे, किरण भोसले, राजेश संनोळी सर्व सदस्या आणि बामणोलीतील समस्त गावकरी

मंजूर निधी असलेल्या कामांचा आज शुभारंभ गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ. गीताताई सुभाष चिंचकर यांच्या हस्ते पार पडला. या विकास कामांमध्ये प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करणे साठी २ कोटी ३८ लाख यापैकी भैरवनाथ मंदिर परीसरा मध्ये पथदिवे लावणे ३४ लाख या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच नागरी सुविधा योजनेमधून वार्ड क्र २ मध्ये बंदिस्त गटर करणे. १६ लाख ६६ हजार , जनसुविधा योजने मधून वार्ड क्र २ मध्ये अंतर्गत रस्त्यास १६ लाख, ग्राम विकास निधी २५ १५ अंतर्गत ३० लाख २२ हजार असे एकूण मंजूर निधीच्या कामांचा शुभारंभ पार पडला.
बामणोली गावास पुनर्वसन होऊन ६० वर्षे झाले. प्रथमच ग्रामदैवत श्री.भैरवनाथ मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करून आणला यामध्ये श्री. भैरवनाथ मंदिराचे वॉल कंपाऊंड, वॉकींग ट्रॅक, भाविकांना बसणेसाठी स्टील बाकडे, स्वच्छता गृह, भक्त निवास,मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे. व मंदिराकडे जाणारे रस्ते करण्यात येणार आहेत.

या कामाच्या शुभारंभावेळी गावचे नेते सुभाष चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, सर्व ग्रा.प. सदस्य राजेश सन्नोळी, दिग्विजय चिंचकर, किरण भोसले, संतोष सरगर, भीमराव रुपनर, अमित आवळे, सौ. संगीता पाटील, अर्चना पाटील , स्वरूपा वारणकर, रुपाली यमगर, स्नेहल व्हनसुरे, मालन गायकवाड, प्रियांका बामणे, अनिता जाधव, माजी उपसरपंच संजय मोटे व भैरवनाथ मंदिर ट्रस्टी बाबुराव शिंदकर, रमेश शिंदकर, शशिकांत शिंदकर,संदीप शिंदकर, सतीश शिंदकर, राम शिंदकर, श्रीकांत शिंदकर, दत्तात्रय जांभळे, सदाशिव माळकुटे इ मान्यवर उपस्थित होते. या कामाचा पाठपुरावा ग्रा. प.सदस्य किरण भोसले यांनी केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button