
मिरज येथे आज भगवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरज तालुका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तानाजी सातपुते यांच्या कार्यालयातून भगवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम मिरज तालुक्यातील 65 गावात सभासद नोंदणी करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मिरज तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून लोकांना शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे काम करणार असल्याचे माहिती मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांनी सांगितले आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सभासद नोंदणी प्रचार रथाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे. प्रचार रथाचे उद्घाटन संपर्कप्रमुख विकास कोलटकर,ज्ञानेश्वर कवाळे,चंद्रकांत मंगुरे, संजय काटे, विशाल राजपूत ,समीर देशपांडे, किरण कांबळे ,महादेव हुलवान, दिलीप नाईक ,कुबेर सिंह राजपूत, आर आर पाटील ,बबन गायकवाड ,शिवसेनेचे माजी आजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.