मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे प्राप्त अर्ज तात्काळ निकाली काढा-पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे

सांगली :आज जिल्हाधिकारी कार्यलयात मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आली . या बैठकीत पालकमंत्री म्हणाले ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत.
या योजना राबवित असताना पारदर्शकता ठेवावी . प्राप्त झालेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढण्यात याव्या अशा सूचना कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिल्या आहेत.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी ,पोलीस अधीक्षक संदीप घुगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे , महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण ) संदीप यादव , गट विकास अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ता .9 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यन्त 4 लाख 59 हजार 827 अर्ज प्राप्त झाले असून,4 लाख 24 हजार 211 अर्ज मंजूर झाले . अशंता असामान्य अर्ज 33 हजार 313 असून 2 हजार 303 अर्ज रद्द केले आहे .
अशंता अमान्य अर्जाची त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळवली असून त्या त्रुटींची तात्काळ पुर्तता संबंधितांनी करावी.
ता.17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत या योजनेचे राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात होणार असून त्यांचा हस्ते ज्या महिलांचे 14 ऑगस्ट प्रयन्त अर्ज मंजूर होऊन शासनास प्राप्त झाले आहेत अशा महिलांचा खात्यात पैसे वर्ग होणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण होणार असून प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्रीच्या उपस्थितीने महिला मेळावा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं व इथून पुढे येणारे अर्जाचीही कारवाई पुढे चालू राहील व ही योजना कायमस्वरूपी राहणार असल्याचे देखील सांगितले आहे .