
मिरज:अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना फक्त कागदावर, राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले , योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला, सामाजिक न्याय विभाग साहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्य सरकार कडून आबाल वृद्धांच्या साठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असताना मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या कल्याणकारी योजना तळागाळा पर्यंत पोहचत नसल्याने ह्या योजना कागदावर राहिल्याचे चित्र दिसत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे.
मिरज तालुक्यात फक्त सात वृद्धांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत या योजनेची मुदतवाढ मागणी करून कामात हलगर्जी पना करणारे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिनाक. 5 ऑगस्ट रोजी पत्रक काढून दोन दिवसांची मुदत नोंदणी साठी देण्यात आली होती, सादर योजनेचे नोंदणी फॉर्म ही विभागाकडे उपलब्ध नाहीत ही शोकांतिका आहे, ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांच्या माध्यमातून वड्डी गावा मध्ये आज सुमारे 70 पेक्षा जास्त वयोवृद्धांची मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना शासकीय कामाला वेळ नाही पण ठेकेदारांना घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठी वेळ आहे असा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे .सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे.