मालगाव :तालुका मिरज मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न केल्याच्या निषेधार्त 14/ 8 /2024 पासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार.

गेल्या काही दिवसांपूर्वी मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीस उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर दि. 9-7 -2024 पासून 18-7- 2024 पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मिरज तालुक्यातील सर्वपक्षीय संघटना व आंबेडकरी समाजाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढणार असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.
या निवेदनशी दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी कमिटी नेमणूक करून चौकशी अहवाल आल्यावर ग्रामसेवक सुरेश जगताप त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी मिरज येथे आंदोलकांची भेट घेऊन पंधरा दिवसाची कारवाई करण्याची आश्वासन देण्यात आले होते. तसे लेखी पत्र हे मुख्य कार्य अधिकारी यांच्या सहीने देण्यात आले होते;परंतु जिल्हा प्रशासनाने त्यावर कोणतीच कारवाईने न केल्याच्या निषेधार्थ मालगाव चे उपसरपंच व सदस्यांनी पुन्हा 14 ऑगस्ट पासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
अशी लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने या निवेदनाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा मिरज पंचायत समितीवर महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.