
बुधगाव: गेल्या काही दिवसांपूर्वी बुधगाव ग्रामसेविका यांनी गैरकारभार व भ्रष्टाचार केला असल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी बुधगावातील नागरिक श्रीकांत यमगर यांनी केली होती . सदर अर्जाची दखल घेऊन विभागीय चौकशी केली असता , ग्रामसेविकाकडून कोणताही गैरकारभार झालेला नसून ग्रामपंचायत मध्येही कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही .
ग्रामसेविका आपली बाजू मांडताना म्हणाले की, मासिक मीटिंग असल्याने यमगर यांच्या घरकुलची कागदपत्रे देण्याचे विलंब झाला असल्याचे त्यांनी सांगितले .
इथुनपुढे कामाचे नियोजन करून वेळेवर काम पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामसेविका यांनी दिले. सहाय्यक गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी पंचायत यांनी देखील अर्जदार यमगर यांचे शंकाचे निरसन केले व अर्जदारास अर्ज मागे घेण्यास विनंती केली.
त्या विनंतीस मान देऊन यमगर यांनी अर्ज मागे घेण्याचे मान्य केले.तसेच ग्रामसेविका व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांना नागरिकांची कामे नियोजन करून वेळेत पूर्ण करण्याबाबाबत आदेश देण्यात आले.
