सांगली जिल्हा ग्राहक आयोगाचा मोठा दणका; ‘आकाश बायजूस’ संस्थेला दणका, अ‍ॅड. मोहसीन आयुब शेख यांचा यशस्वी लढा

सांगली, ता.३ : येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणांत ग्राहकांच्या हिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. शैक्षणिक सेवेत त्रुटी आणि विद्यार्थ्यांचा छळ केल्याबद्दल ‘आकाश बायजूस’ संस्थेला जाब विचारला आहे.

या प्रकरणांत तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. मोहसीन आयुब शेख यांनी प्रभावी बाजू मांडून ग्राहकांना न्याय मिळवून दिला.१. आकाश बायजूस एज्युकेशन: खोटी आश्वासने आणि विद्यार्थ्यांचा छळमौजे म्हैसाळ येथील तक्रारदार श्री. मेघराज शंकरराव शिंदे यांनी आपला मुलगा अंशुमन आणि पुतणी संयोगिता यांच्या इयत्ता १० वीच्या प्रवेशासाठी सांगलीतील विश्रामबाग येथील ‘आकाश बायजूस’मध्ये प्रवेश घेतला होता. सुरुवातीला ७९ हजार रुपये शुल्क सांगून, नंतर सवलतीचे आमिष दाखवून प्रत्येकी ४८ हजार रुपयांत प्रवेश निश्चित करण्यात आला.तक्रारदारांनी एकूण ५३,९९८/- रुपये शुल्क भरले. मात्र, शुल्क भरूनही मुलांना गणवेश, पुस्तके किंवा ओळखपत्रे देण्यात आली नाहीत आणि एकही ऑनलाईन क्लास घेण्यात आला नाही. उलट, उर्वरित शुल्कासाठी भर क्लासमध्ये मुलांचा मानसिक छळ करून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यामुळे मुलांनी क्लासला जाण्यास नकार दिला. अ‍ॅड. मोहसीन आयुब शेख यांच्यामार्फत पाठवलेल्या नोटीसची दखल न घेतल्याने आयोगात दाद मागण्यात आली. हे कृत्य ‘दोषपूर्ण सेवा’ (Deficiency in Service) आणि ‘अनुचित व्यापार पद्धत’ (Unfair Trade Practice) असल्याचे सिद्ध झाले आहे. तक्रारदारांनी आता फी परतावा आणि नुकसान भरपाईसह एकूण ९३,९९८/- रुपयांची मागणी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button