सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई: हद्दपार गुंडासह तिघांना अटक, ६ पिस्तुलं आणि ३ जिवंत काडतुसे जप्त

सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई: हद्दपार गुंडासह तिघांना अटक, ६ पिस्तुलं आणि ३ जिवंत काडतुसे जप्त.

सांगली ता. ४ जानेवारी : आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत एका हद्दपार गुन्हेगारासह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ६ देशी बनावटीची पिस्तुलं आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक केलेल्या संसयित आरोपींची नावे किरण शंकर लोखंडे (वय २४, रा. वाघमोडेनगर, कुपवाड),  अभिजीत अरुण राणे (वय ३२, रा. शारदानगर, कुपवाड रोड),  तुषार नागेश माने (वय ३०, रा. लक्ष्मी मंदिर, हाडको कॉलनी, सांगली) असे आहे.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार सांगली शहरातील अभुजनगर ते वारणालीकडे जाणाऱ्या १०० फुटी रोडवर काही संशयित इसम शस्त्रे घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस शिपाई संकेत कानडे, पवन सदामते, अभिजीत माळकर आणि सूरज थोरात यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपींचे नावे  किरण शंकर लोखंडे,  अभिजीत अरुण राणे,  तुषार नागेश माने असे आहेत. यातील  किरण शंकर लोखंडे  हा रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार आहे.या कारवाईत मध्यप्रदेशातील उमराटी येथील ‘पाजी’ नावाचा मुख्य पुरवठादार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी ही ६ पिस्तुलं मे २०२५ मध्ये मध्यप्रदेशातील उमराटी (जि. बलवाडी) येथून खरेदी केली होती. ही शस्त्रे सांगली परिसरात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने आणली असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. त्यांच्याकडून ६ देशी बनावटीची पिस्तुलं: किंमत ३,६०,०००/- रुपये, ३ जिवंत काडतुसे: किंमत १,५००/- रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर (MH-10-AV-1827): किंमत ६०,०००/- रुपये असा हा एकूण मुद्देमाल: ४ लाख २१ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, सपोनि जयदीप कळेकर, आणि एलसीबीच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील आणि अभिजीत पाटील यांचेही सहकार्य लाभले. आरोपींविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button