
सांगली, ता. ४ जानेवारी : सांगलीच्या मध्यवर्ती भागातील १३ एकर मोक्याची जागा अखेर महापालिकेच्या ताब्यात आली आहे. १९६४ पासून सुरू असलेला हा न्यायालयीन लढा निकाली लागला असून, आता शहरात अत्याधुनिक ट्रक पार्किंग आणि ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १३ एकर (५ हेक्टर ०८ आर) यामुळे ट्रक पार्किंग, वर्कशॉप व ट्रान्सपोर्ट ऑफिस साठी उपयोग होइल. सदर जागा जुना सर्वे नं. ९९/२, सांगली येथे आहे.
या विजयामुळे सांगलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि विधी व नगररचना विभागाच्या चिकाटीला हे मोठे यश मिळाले आहे.