खटाव विकासकामाच्या डिजिटल फलकाची अज्ञाताकडून तोडफोड; ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

खटाव , ७ डिसेंबर (सांगली – टुडे वृत्तसेवा) : मिरज तालुक्यातील खटाव येथे विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नाईकवाडी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सोमेश्वर मंदिर परिसरात काँक्रिटीकरण रस्ता व सोयीसुविधांच्या कामाच्या उद्घाटन डिजिटल फलकाची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. गावातील नागरिक तीव्र संतापाले आहेत. विधान परिषदेचे आमदार नाईकवाडी यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि याचे दोन महिन्यांपूर्वीच आमदार इंद्रिस नाईकवाडी व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. शनिवारी (ता.६) रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी हा उद्घाटन फलक तोडून जमिनीवर पाडला.

या घटनेचा सामान्य नागरिक आणि विविध राजकीय संघटनांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी तातडीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना कामगार संघटना, सांगली जिल्ह्याच्या वतीने या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला असून, उद्या, सोमवारी, याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button