हॉटेल व्यवस्थापकाला दमदाटी करून लुटणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या कुपवाड पोलिसांनी मुसक्या आवळल्या

कुपवाड, ६ डिसेंबर (सांगली टुडे वृत्तसेवा) : येथील ‘ एस डी’ हॉटेलमधील व्यस्थापकाला धमकावून शिवीगाळी करत गल्ल्यातील पैसे चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या कुपवाड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सुनील बाबासो दुधाळ, रा. बजरंगनगर, कुपवाड असे ताब्यात घेतलेल्या सराईताचे नाव आहे. सदर घटना ही शुक्रवारी (ता.५) रात्री आकाराच्या सुमारास घडली. याबाबत कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून हॉटेलचे व्यवस्थापक अभिजित सुनील सरगर यांनी पोलीसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.५) रात्री आकाराचा सुमारास कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल एस. डी.’ च्या व्यवस्थापकला दमदाटी आणि शिवीगाळ करत मी इथला दादा आहे. ” माझ्या विरोधात पोलीसांत तक्रार दिलास तर एका – एकाला गोळ्या घालीन ” असे म्हणत गल्ल्यातील ६,००० रुपये जबरीने चोरून बुलटवरून एका अनोळखी सोबत निघून गेल्याच्या तक्रारीवरून कुपवाड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधीकारी आनंदराव घाडगे यांनी सदर मालमत्ते विरुद्धच्या गुन्ह्याचा छडा लावून गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पोउपनि अमोल थोरात गुन्हे प्रकटिकरण शाखाचे अंमलदार संदीप पाटील, अविनाश पाटील, प्रवीण मोहिते आणि संदीप घस्ते यांनी आरोपी सुनील बाबासो दुधाळ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाखाची बुलेट व रोख रक्कम ६ हजार असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, अंमलदार संदीप पाटील, अविनाश पाटील, प्रवीण मोहिते, संदीप घस्ते आदींनी केली असून या पुढील अधिक तपास पोउपनि अमोल थोरात हे करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button