‘टॅक्स धडक’ मोहिमेचा भव्य परिणाम; एकाच दिवसात तब्बल १६ लाखांची विक्रमी वसुली

सांगली विभागात १० ठिकाणी कठोर कारवाई; मनपाचा पवित्रा कायम — थकबाकी न भरणारे २ मालमत्ता सील

सांगली, ४ डिसेंबर ( सांगली-टुडे वृत्तसेवा) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने प्रलंबित कर वसुलीसाठी राबवलेल्या ‘टॅक्स धडक’ विशेष मोहिमेला आज बुधवारी (ता.०३) मोठे यश मिळाले. आयुक्त सत्यम गांधी यांच्या ‘शून्य-तडजोड’ धोरणानुसार राबवलेल्या या विशेष मोहिमेत मनपाने एकाच दिवसात १६,२१,४५५/- (सोळा लाख एकवीस हजार चारशे पंचावन्न रुपये) इतक्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली केली.

सांगली विभागात १० ठिकाणी संयुक्तपणे कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांनी जागेवरच मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली. तात्काळ वसुली (रोख + चेक) ६,१६,०८८/-सील कारवाईतील थकित महसूल २,४५,७८३/-एकूण दिवसाची वसुली १६,२१,४५५/- तर २ मिळकती सीलप्रलंबित कर भरण्यास वारंवार नकार देणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिकेने अत्यंत कडक कारवाई केली. दोन मोठ्या मालमत्तांवर ‘सील’ मारण्यात आले. पटेल अशोक प्रेमजी- १,५४,४७९/- थकबाकी पोवार दिलीप शंकर ९१,३०४/- थकबाकी या कारवाईतून मनपाने “कर न भरल्यास कठोर कारवाई अपरिहार्य आहे; कोणताही अपवाद नाही” हा स्पष्ट संदेश पुन्हा एखादा अधोरेखित केला आहे.

शहराच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली, ज्याचा विभागनिहाय अहवाल खालीलप्रमाणे आहे:प्रभाग समितीवसुली

प्रभाग समिती – १ (सांगली)४,९४,०८३/-

प्रभाग समिती – २ (सांगली) ४,३५,७३७/-

प्रभाग समिती – ३ (कुपवाड) ४,३९,४१६/-

प्रभाग समिती – ४ (मिरज) २,५२,२१९/-

एकूण एकत्रित वसुली १६,२१,४५५/- रु. करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने सर्व थकबाकीदारांना आवाहन केले आहे की, शहरातील विकास कामे, रस्ते, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा याच करातून उभारल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी जप्ती, सील व दंडात्मक कारवाईची वेळ येऊ न देता, आपला मालमत्ता कर तातडीने जमा करून शहराच्या प्रगतीत आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button