देशभक्ती मार्गदर्शनासाठी इच्छुक माजी सैनिकांनी संपर्क साधावा; सांगली मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये राबवणार ‘देशसेवा प्रोत्साहन’ उपक्रम

सांगली, ४ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा): सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये (प्राथमिक आणि माध्यमिक) देशभक्तीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशसेवेस प्रोत्साहित करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी तातडीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगलीच्या ९४०४९६९१४५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर त्वरित नमूद करावा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button