इस्राईल देशात रोजगारासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

‘रिनोवेशन कन्स्ट्रक्शन’ क्षेत्रात २६०० हून अधिक पदांसाठी संधी; maharashtrainternational.com वर नोंदणी सुरू

सांगली, ४ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे ‘रिनोवेशन कन्स्ट्रक्शन’ (Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी

https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवावी व तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

इस्राईल देशात एकूण २,६०० पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. पद (Job Role)अंदाजित जागांची संख्या प्लास्टरिंग वर्क (Plastering Work)१,०००सिरॅमिक टायलिंग (Ceramic Tiling)१,०००ड्रायवॉल वर्कर (Drywall Worker)३००मेसॉन (Mason)३०० एकूण जागा २,६०० यासाठी किमान १० वी पास, वय २५ ते ५० व संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान (वाचन, लेखन व संवादकौशल्य) आवश्यक.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button