
पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून अर्जदारांना थेट भेटण्याची संधी
सांगली, ४ डिसेंबर ( सांगली-टुडे वृत्तसेवा) : सामान्य नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुधवार, (ता.१०) डिसेंबर २०२५ रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे संवादसत्र आयोजित करण्यात आले आहे.
या संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना थेट भेटू शकतात आणि चर्चा करू शकतात.
कार्यालयाचे ठिकाण, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर ५/२/२ बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे. यासाठी दुपारी ३ ते ५ वेळ असणार आहे.
संवाद सत्रात प्रवेश मिळवण्यासाठी अर्जदारांनी आपल्या प्रश्नांची माहिती आगाऊ ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. ईमेल करा: फाईल क्रमांक, नवीनतम पासपोर्ट क्रमांक (असल्यास), नाव आणि आपला प्रश्न थोडक्यात नमूद करून
rpo.pune@mea.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा.
पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून एक पुष्टीकरण (Confirmation) ईमेल पाठवला जाईल.प्रवेश: हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल. ओपन हाऊससाठी नोंदणी दुपारी २ वाजता सुरू होईल.