कुपवाडात दहशत माजवणाऱ्या सराईतांना कुपवाड पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी दाखवला ‘खाकी’चा वचक

सोसायटी चौकात थरार; ‘फिल्मी स्टाईल’ कारवाईने परिसर शांत

कुपवाड, ३ नोव्हेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा): कुपवाड येथील मुख्य सोसायटी चौकात आज बुधवारी (ता.३) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांवर कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी थेट रस्त्यावर उतरून ‘फिल्मी स्टाईल’मध्ये पोलिसी खाक्या दाखवला. घाडगे यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे कुपवाड परिसरात हे गस्त घालत असताना, मुख्य चौकात दोन सराईत गुन्हेगार खुलेआमपणे ‘फळकूटगीरी’ करत गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रभारी अधिकारी घाडगे यांनी कोणतीही भीती न बाळगता, क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कारवाई करत  कायद्याचा धाक दाखवत गर्दीची पर्वा न करता, त्या दोन्ही सराईतांना जागीच पकडून पोलिसी खाक्या दाखवत चांगलाच प्रसाद दिला. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे चौकात क्षणभर गडबडीचे आणि धांदलीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

प्रभारी अधिकारी घाडगे यांची फिल्मी स्टाईल’ कारवाईने परिसर शांत नवनियुक्त कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या या धाडसी व कणखर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जरब निर्माण झाला आहे. या कारवाईनंतर सोसायटी चौकात शांतता पसरली. 

नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button