कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; चोरीच्या मोटारसायकलसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

कुपवाड, ३० नोव्हेंबर : कुपवाड पोलिसांना चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील सक्रिय असणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पकडण्यात मोठे यश आले आहे. सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटारसायकलसह ५ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल अशोक घोरपडे, वय ३६ वर्षे, मुळ रा. मनेराजुरी, ता. तासगाव, सध्या रा. इदगाह मैदानजवळ, मिरज आणि विजय सुरेश बल्लाळ, वय २७ वर्षे, रा. माजी सैनिक वसाहत पाण्याचे टाकीजवळ, मिरज असे ताब्यात घेतलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. तर विकास दत्तु घाडगे, रा. कवलापूर हा फरार आहे. कुपवाड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन कंपनीतील साहित्य चोरी आणि एक मोटारसायकल चोरीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाल या मध्ये बिडाचे प्लायव्हील आणि स्क्रॅप ५४,४०० रुपयांचे, टाटा ए.सी.ई. इलेक्ट्रिक टेम्पो (MH-१०-T-४८८३) ४,५०,००० रुपयांची आणि हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल (MH-०९-DN-४८८३) ४५,००० रुपयांची असा एकूण ५ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्दे माल पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राज कास्टिंग फाउंड्रीचे मालक अशोक बाबा कोठावळे (वय ६५, रा. विश्रामबाग, सांगली यांची औधोगिक वसाहतमधील राज कास्टिंग फाउंड्री या कंपनीत चोरट्यांनी दि. ०२ नोव्हेंबर व २६ नोव्हेंबर २०२५ रोजी या दिवशी कंपनीच्या कंपाउंडवरून उड्या मारून, स्टोअररूमचे लॉक तोडून बिडाचे प्लायव्हील आणि स्क्रॅप असा माल चोरला होता. याबाबत शुक्रवारी (ता.२८) कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावून गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात व त्यांचा पथकाला दिली.

त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करत असताना, डीबी पथकातील प्रविण मोहिते आणि अविनाश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीचा माल विक्रीसाठी टाटा ए.सी.ई. इलेक्ट्रिक टेम्पोमधून (पिवळा कागद लावून) आणि सोबत मोटारसायकलवरून काही इसम सह्याद्री स्टार्च ते कुपवाड मार्गे जात आहेत. दिलेल्या माहितीने पोलिसांनी मेनन पिस्टन चौक येथे सापळा रचला. पोलिसांना पाहून टेम्पोचालक विकास घाडगे याने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. टेम्पोमधील विजय सुरेश बल्लाळ आणि मोटार सायकलवरील अमोल अशोक घोरपडे या दोघांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदर मालाबाबत चौकशी केली असता अमोल व विजय याने हा माल तिघांनी राज कास्टिंग फाउंड्रीतल चोरल्याची कबूली दिली. पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी ही तिघांनी मिळून २१ ऑक्टोबर, २३ ऑक्टोबर आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी लठ्ठे कॉलेज जवळील विरेशा कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या जवळील हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल ही (ता.४) नोव्हेंबर रोजी कोंडके मळा येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांचाकडून एकूण ५ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचावर कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील फरार आरोपी विकास घाडगे याचा शोध सुरू असून या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुळीक हे करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संदीप पाटील, निलेश कोळेकर, आप्पासो नरुटे, मयुर मुळीक, अविनाश पाटील, प्रविण मोहिते, मधुकर सरगर, संदिप गस्ते आणि सायबर विभागाकडील पोकों/अभिजीत पाटील, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button