कृष्णा व्हॅली क्लबचा दावा फेटाळला; कुपवाड MIDC मधिल स्टेट बँक इंडियासह गाळेधारकांचे भवितव्य अंधारात

कुपवाड, ३० नोव्हेंबर : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या जागेतील ‘अपप्रवेशित’ व्यावसायिक आणि गाळेधारकांचे भवितव्य अंधारात आले आहे. चेंबरचे प्रशासक ज्ञा.शि. आंधळे यांच्या विरोधात कृष्णा व्हॅली क्लबने (हॉटेल व बार) दाखल केलेला ‘निरंतर ताकीदीचा’ दावा सांगली येथील दिवाणी न्यायालयाने शनिवार (ता.२९)   फेटाळला आहे. कृष्णा व्हॅली चेंबर संस्थेचे सर्व बदल अर्ज रद्द झाल्यानंतर संस्थेवर प्रशासक नियुक्ती झाली होती.

संस्थेचे प्रशासक आंधळे यांनी विनाभाडे व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली होती. त्याला विरोध म्हणून क्लबने न्यायालयात धाव घेतली. मात्र, क्लबकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याने कोर्टाने हा दावा फेटाळला, तसेच वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी मागितलेला ‘स्टे’ अर्जही रद्द केला.या निकालानंतर, कॉम्प्लेक्समधील अपप्रवेशितांचे वीज कनेक्शन लवकरच तोडले जाईल, अशी माहिती प्रशासक आंधळे यांनी दिली. यामध्ये कृष्णा व्हॅली क्लब आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (MIDC शाखा) यांचाही समावेश आहे, ज्यामुळे या सर्वांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button