नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २ डिसेंबरला मतदान; १ डिसेंबरपासून प्रचारबंदी लागू

सांगली, २९ नोव्हेंबर : नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून जाहीर प्रचार बंद करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांना सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात किंवा प्रसारणास सक्त मनाई असेल. मतदान प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button