सांगली मनपाचा महिलांसाठी मोठा निर्णय! ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’चे मोफत प्रशिक्षण

शहरातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी  स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध

सांगली, २८ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास  आणि दिव्यांग कल्याण विभागाने शहरातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी  मनपाने आता स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांना मनपाच्या वतीने ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’चे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विशेष उपक्रमाचा उद्देश महिलांना उच्च दर्जाचे कौशल्ये देऊन त्यांना उद्योगाभिमुख बनवणे आणि घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करणे हा आहे. यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन बळकट होऊल आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रवेश अर्ज मनपाच्या महिला व बाल विकास विभागात उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ डिसेंबर  पर्यंत असून पूर्ण भरलेले अर्ज आवशक्य ते कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत जमा करावे लागतील.

हा उपक्रम महिलांच्या कौशल्यविकासाला गती देणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करणारा आणि कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे, असा विभागाचा विश्वास आहे. इच्छुक महिला व युवतींनी या मोफत अॅडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे

महिला व बाल विकास व दिव्यांग कल्याण विभाग

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button