मिरजमध्ये आरोग्यसेवेचा नवा अध्याय: तीन ‘आयुष्मान आरोग्यमंदिरांचे’ लोकार्पण

सांगली, २६ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मिरज शहरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत तीन नवीन ‘आयुष्मान आरोग्यमंदिरां’चे उद्घाटन आज बुधवारी (ता. २६) उत्साहात झाले. यामुळे मिरजेतील नागरिकांना आता मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा त्वरित उपलब्ध होणार आहे.  या भव्य सोहळ्याचे उद्घाटन  खासदार विशाल पाटील आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी आयेशा नायकवडी, आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण झालेल्या केंद्राची ठिकाणे १) प्रियदर्शनी हॉटेल जवळ  २) तेली गल्ली  ३) जिजामाता उद्यान जवळ, मिरज अशी आहेत.  

या आरोग्यमंदिरांमध्ये रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन तपासणी, मोफत औषध वितरण, लसीकरण, मातृ–शिशू स्वास्थ्य सेवा, तसेच क्षयरोग, मलेरिया व कुपोषण प्रतिबंधक कार्यक्रमांसह आरोग्य जनजागृती सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button