मिरजेत आग; मनपा अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

मिरज, २६ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाने आज (ता.२६) पहाटे मिरज येथील इसापूरे हॉस्पिटलजवळील एका घरात लागलेली आग काही मिनिटांतच आटोक्यात आणली. पहाटे ३: ४० च्या सुमारास घरातील फ्रिजमधून धूर निघाल्याने ही आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील व्यक्तींनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ वीजपुरवठा बंद केल्यामुळे मोठी हानी टळली. किरकोळ घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यावेळी महानगरपालिका अग्निशमन विभागाने नागरिकांना जुनी वायरिंग आणि विद्युत उपकरणांची वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button