सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अवैध दारू वाहतूक करणाऱ्यास ओमनी कारसह अटक, २ लाख ४० हजरांचा मुद्देमाल जप्त

सांगली, २६ नोव्हेंबर  : आगामी  नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका २०२५ च्या अनुषंगाने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  अवैधरित्या दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. संशयीत आरोपी पुंडलिक परप्पा करेन्नवर, वय ४६ वर्ष, रा. सावंत प्लॅट, सांगली  याच्याकडून एक ओमनी चारचाकी आणि दारूचा साठा असा हा एकूण २ लाख ४० हजार रुपये  किमतीचा मुद्देमाल  जप्त केला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पोलीस प्रमुख  संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार केले.(ता.२६)  रोजी मध्यरात्री ००:३० वाजेच्या सुमारास, पथकातील पोहेकॉ. अनिल कोळेकर आणि पोकॉ. विक्रम खोत यांना  बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, पुंडलिक करेन्नवर हा  ओमनी चारचाकी वाहनातून कवठेपिरान ते लक्ष्मी फाटा रोडवरून बेकायदेशीररित्या देशी दारू घेऊन जाणार असल्याची  त्या माहितीने पथकाने तत्काळ कवठेपिरान ते लक्ष्मी फाटा रोडवर सापळा रचला. संशयित  मारुती ओमनी चारचाकी दिसताच पोलिसांनी थांबवले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव पुंडलिक करेन्नवर सांगितले. वाहनाची झडती घेतली असता, ओमनीच्या पाठीमागील सीटवर देशी दारूचे बॉक्स आढळून आले.  दारू वाहतुकीच्या परवान्याबद्दल विचारले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदर दारूचा माल तो जादा दराने विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी  देशी संत्रा रेठरा कंपनीच्या २०० बाटल्या, आयकॅप संत्रा कंपनीच्या २०० बाटल्या आणि एक्स कंपनीच्या ६०० बाटल्या, अशा एकूण १००० सीलबंद बाटल्या (एकूण किंमत ₹४०,०००/-) व  सुझुकी ओमनी चारचाकी  २ लाख रुपये असा हा एकूण  २ लाख ४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलीस विक्रम खोत यांच्या फिर्यादीवरून आरोपी पुंडलिक करेन्नवर याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button