कुपवाड रस्त्यावर भीषण अपघात; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

 कुपवाड, २५ नोव्हेंबर : कुपवाड ते मिरज रस्त्यादरम्यान सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत झालेल्या एका दुचाकी चालकाविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत झालेल्या दुचाकी चालकाचे नाव राहुल सुभाष कांबळे (वय ३८, रा. मिरज) असे आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तुषार अशोक पिसे (एमएच १० ईबी ५११) हा आपली दुचाकी घेऊन भाऊ रोहित पिसे यांची सासू, रेणू राजू शिंदे यांना कुपवाडहून मिरजेतील शासकीय रुग्णालयात सोडण्यासाठी जात होता. कुपवाड-मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोरून त्यांची दुचाकी जात असताना, मिरजेकडून कुपवाडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या राहुल सुभाष कांबळे याच्या दुचाकीने (एमएच १० ईपी ८८६) पिसे यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.  या अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही दुचाकी चालक, तुषार पिसे आणि राहुल कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या रेणू शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी रेणू शिंदे यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताला राहुल कांबळे कारणीभूत ठरल्याची तक्रार मयत तुषार पिसे यांचा भाऊ रोहित पिसे यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मयत राहुल कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button