सांगलीत १०० फुटी रोडवर झाडीत अडकलेल्या कोल्ह्याची सुटका; वनविभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी

सांगली, २५ नोव्हेंबर : सांगली शहरातील १०० फुटी रोडवरील लक्ष्मी नारायण कॉलनी, डी मार्टच्या मागील परिसरात मंगळवारी सायंकाळी एका कोल्ह्याला झाडीमध्ये अडकलेले पाहून नागरिकांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे पथक आणि रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत काळजीपूर्वक मोहीम राबवत, या पथकाने अडकलेल्या कोल्ह्याला सुखरूपपणे पकडले आणि पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले.

शहराच्या मध्यवस्तीत कोल्हा दिसल्यामुळे त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांनी, मोठी गर्दी केली होती. कोल्ह्याला पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता होती, परंतु वनविभागाने गर्दी नियंत्रणात ठेवून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. कोल्ह्याला नागरी वस्तीपासून दूर नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आले. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button