महापालिका प्रशासनाच्या विरोधात कुपवाडला रुपेश मोकाशींचे उपोषण

कुपवाड: महापालिका प्रशासना विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख रूपेश मोकाशी व इतर पदाधिकारिंचे लक्ष्मी मंदिर चौक परिसरात आमरण उपोषण.

‘लेखी आश्वासनानंतर’च घेतली माघार: भुयारी गटार आणि रस्ते कामाच्या चौकशीची मागणी

कुपवाड, ता. २४ नोव्हेंबर : सुमारे २५३ कोटी निधीच्या भुयारी गटार योजनेवरील ठेकेदारास काळ्या यादीत टाका, बालाजीनगर ते पाटबंधारे कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे नव्याने मूल्यमापन करा, आणि निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख रुपेश मोकाशी यांनी सोमवारी (ता. २४) लक्ष्मी मंदिर परिसरात आमरण उपोषण केले.

महापालिका प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. सहायक आयुक्त सचिन सागावकर आणि नगर अभियंता महेश मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर अधिकाऱ्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन मोकाशी यांनी आपले एकदिवसीय उपोषण मागे घेतले.

प्रमुख मागण्या आणि आक्षेप:

१. भुयारी गटार योजना (२६३ कोटी):

  • योजनेतील अनियमितता तातडीने दूर करावी.
  • निकृष्ट दर्जाच्या चेंबर्सचे पीसीसी कोर कटिंग (PCC Core Cutting) करून तांत्रिक चाचणी करावी.
  • बांधकामात वापरलेल्या विटा, खडी आणि क्रश सँडची गुणवत्ता तपासली जावी.
  • काळ्या मातीमध्ये पाईपलाईन टाकताना मुरुमाचा थर (Bedding) नसल्याने, तो डिझाइनप्रमाणे टाकून पाईप्स पुन्हा बसवावेत.
  • २७ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी (STP) चे डिझाइन चुकीचे असल्याने ते बदलून नव्याने काम करावे.
  • रस्त्यावरील चर योग्य पद्धतीने बुजवून रस्ते पूर्ववत करावेत.

२. रस्ते काम (बालाजीनगर ते वारणाली पाटबंधारे कार्यालय – ३.६४ कोटी):

  • रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप.
  • कोर कटिंग करून सर्व थरांचे अचूक मोजमाप करावे.
  • कार्पेटिंगसाठी वापरलेल्या डांबराचे प्रमाण (Bitumen Content) तपासावे.

३. प्रशासकीय कारवाई:

  • वरील दोन्ही कामांच्या देयकांवर (Bills) स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी.

या आंदोलनाप्रसंगी रवी खराडे, शंभोराज काटकर, सतीश साखळकर, अजित दुधाळ, मकरंद कुलकर्णी, केशव ढाणेकर, अभिजित गद्रे, सचिन कांबळे, प्रशांत बनसोडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button