
कुपवाड, २४ नोव्हेंबर : मिरज औधोगिक वसाहतीत दोन दुचाकींचा समोरा-समोर झालेल्या धडकेत दोघेजण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.२४) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या आपघातात राहुल सुभाष कांबळे ( वय ३८ वर्ष, रा.उपळावी ता. तासगाव) तुषार अशोक पिसे ( वय २४ वर्ष रा. मुजावर प्लॅट, कुपवाड ) या दोघांचा मृत्यू झाला आहे. रेणू राजू शिंगे (वय ६५ वर्ष , सध्या रा. मुजावर प्लॅट, कुपवाड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णलयात उपचार सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मिरज औधिगिक वसाहतीतील विमल कंपनी सोमरील रस्त्यावर सोमवारी (ता.२४) रोजी रात्री अपघाताची घटना घडली. यामध्ये दोन दुचाकींचा एकमेकांना समोरा समोर जोराची धडक झाली. या आपघातात दोघे दुचाकीवालेसह एक महिला गंभीर जखमी झाली. यावेळी माहिती मिळताच आयुष टीमने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातून अतिरक्तस्राव झाल्याने दोघांचा दोघांचा मृत्यू झाला. आपघातामधील जखमी महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत . सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम कुपवाड पोलीसांत चालू होते.