एकल वापर प्लास्टिक विरोधात मनपाची कठोर कारवाई! कुपवाड क्षेत्रात ३०,००० रु. दंड; ६ व्यावसायिकांवर संयुक्त तपासणी मोहीम

सांगली, २४ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने एकल वापर प्लास्टिक विरोधात आज (ता.२२) कुपवाड क्षेत्रात मोठी दंडात्मक कारवाई केली. महापालिका आयुक्त सत्यम गांधी आदेशाने आणि उपायुक्त सौ. स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३०,००० रु. दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली. या सहाही आस्थापनांवर संयुक्तपणे एकूण ३०,००० रु. इतका दंड आकारण्यात आला. ‘ही मोहीम शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, या माध्यमातून राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ आणि केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांना बळकटी मिळाली आहे.

शहरात एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे, पर्यावरण प्रदूषण, कचरा वाढ आणि नालाबंदी यांसारख्या समस्या टाळणे, तसेच नागरिक व व्यावसायिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या कारवाईमागचा मुख्य हेतू आहे. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला दंडापासून सुट नाही. नियमांचे काटेकोर पालन करणे हे शहरवासीयांचे आणि व्यावसायिकांचे कर्तव्य आहे,” असा स्पष्ट संदेश महापालिका प्रशासनाने केला आहे.

कारवाई करणारे अधिकारी सचिन सागावकर , सिद्धांत ठोकळे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, गणेश धोतरे आणि सौ. अंजली कुदळे यांनी केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button