
कुपवाड, २२ नोव्हेंबर : औधिगिक वसाहत मिरज येथील सह्याद्री स्टार्च कंपनीत कामावर असताना आपघातात गंभीर भाजल्यामुळे जखमी झालेल्या एका ५२ वर्षीय कामगाराचा शनिवार (ता.२२) रोजी पहाटे शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत कामगाराचे नाव गजानन शिवपाद बाडगे (वय ५२, रा. शिवशक्तीनगर, एमआयडीसी मिरज) असे आहे. सदर घटना ही सह्याद्री स्टार्च कंपनीत गुरुवारी (ता.२०) रोजी घडली होती. घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली आहे. याबाबत फिर्याद सीएमओ डॉ. प्राची मिनासे, सिव्हिल हॉस्पिटल सांगली यांनी दिली.

पोलिसांची अधिक माहितीनुसार मयत गजानन शिवपाद बाडगे हे गुरुवारी (ता.२०) रोजी सकाळी ९ वाजता सह्याद्री स्टार्च कंपनीमध्ये काम करत असताना दुर्दैवाने भाजून जखमी झाले. त्यांना त्यांचा भाचा विजय बबन बडेर यांनी तातडीने उपचारासाठी जखमी अवस्थेत दुपारी एकचा दरम्यान शासकीय रुग्णालय सांगली येथे दाखल केले. गजानन बाडगे यांचा उपचार सुरु असताना शनिवारी (ता.२२) रोजी पहाटे ३ च्या सुमारास त्यांचा मृत्य झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली असून, मृतदेहाचे शवविच्छेदनास पाठविण्यात आले आहे. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत.