
आरग, २२ नोव्हेंबर : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, आरग शाखेचा ५१ वा वर्धापन दिन शुक्रवार (ता. २१) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाखा व्यवस्थापक श्री. प्रकाश पाटील, श्री. लंगोटे साहेब, श्री. आर. एस. पाटील आणि सौ. शशिकला गावडे यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी आरगचे माजी सरपंच श्री. तुकाराम पाटील आणि श्रीशैल चौगुले यांचीही उपस्थिती होती. मोहनराव शिंदे (सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बँकेच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता आणि डिजिटल सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी बँक ऑफ इंडिया, सांगलीचे शाखा व्यवस्थापक श्री. दिपक लक्ष्मण शिरसगावकर यांनीही शेतकरी आणि ग्राहकांना शेतीबरोबरच जोड व्यवसाय करण्यास, तसेच सर्व आर्थिक विकास महामंडळाकडून उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यास मार्गदर्शन केले. ग्राहकांना प्रधानमंत्री सरल विमा (शून्य प्रीमियम), जीवन-ज्योती विमा आणि अटल पेन्शन योजना या केंद्र सरकारच्या योजनांचीही माहिती देण्यात आली. शाखेची उल्लेखनीय कामगिरी (मार्च २०२५ अखेर)
तपशील, रक्कम एकूण व्यवसाय
२०० कोटी एकूण ठेवी, ८२ कोटी ७९ लाख एकूण कर्जे, १०२ कोटी ५२ लाख निव्वळ नफा, ५ कोटी २६ लाख
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्च २०२५ मध्ये १०० वर्षांत पदार्पण करत आहे. या पार्श्वभूमीवर आरग शाखेने मार्च २०२५ अखेर उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. दीर्घकाळ बँकेच्या कार्याला हातभार लावणारे ज्येष्ठ ठेवीदार श्री. बापूसो कोळी यांचा सत्कार करण्यात आला. आरग वि. का. स. सोसायटीचे नूतन सेक्रेटरी श्री. सचिन शिवाजी गायकवाड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मोहनराव शिंदे यांनी बँकेच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच कर्जदारांना पाणीपट्टी आणि वीज बिल वेळेत भरण्याची विनंती केली. वर्धापन दिनाच्या समारोपात अरमान मुजावर यांनी आभार प्रदर्शन केले.