
वारणाली ते बालाजीनगर ८० फुटी डी.पी. रोडचे आज सायंकाळी भव्य उद्घाटन; आमदार नायकवडी आणि जिल्हाध्यक्ष जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती
कुपवाड, १९ नोव्हेंबर : माजी नगरसेवक विष्णु माने यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी मंजूर केलेल्या ५० कोटी रुपयांच्या विशेष निधीतून, कुपवाड येथील अत्यंत महत्त्वाच्या ८० फुटी डी.पी. रोडच्या कामाचा भव्य शुभारंभ आज (बुधवार) होत आहे. वारणाली पाटबंधारे ऑफिस ते बालाजीनगर कुपवाडकडे जाणारा हा नवीन रस्ता ४ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता या भव्य शुभारंभ होणार आहे. माजी नगरसेवक विष्णू माने यांनी वारणाली पाटबंधारे ऑफिस समोर, साई मंगल कार्यालय, विद्यानगर येथे हा समारंभ आणि संवाद मेळावा आयोजित केला आला आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार इद्रिसभाई नायकवडी आणि जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर हे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी या ‘संवाद मेळाव्या’चेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व नागरिक आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थितरहावे असे आवाहन करण्यात आले आहे.