महेश पारछे गोळीबार प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची कोठडी

कुपवाड, १९ नोव्हेंबर : पैशाच्या वादातून महेश पारछेवर त्याच्याच मित्राने केलेल्या गोळीभार प्रकरणी संशयीत आरोपी राहुल माने व गणेश खोत यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले आसता दोघा संशयीतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार सोमवारी पहाटे राहुल माने,गणेश खोत त्यांचा मित्र महेश पारछे हे तिघे एकत्र राहुल माने यांच्या मालकीची महिंद्रा थार गाडीतून एकत्र कुपवाड सूतगिरणीकडे येत असताना गणेश खोत व महेश पारछे पैशाच्या देवान घेवणीतून वाद झाला. वादानंतर गणेश खोत याने महेश पारछेला शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तर सोबत असलेल्या राहुल मानेचा राग अनावरण झाल्याने त्याच्या कडील गावठी पिस्तुलने महेश पारछेवर गोळी झाडली. महेश पारछेच्या उजव्या पायाच्या मांडीत गोळी लागल्याने महेश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना समजताच घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेत दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. जखमी व आरोपी हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते तिघेही मित्र आहेत. कुपवाड पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button