कुपवाड औधिगिक वसाहतीत अल्पवयीन मुलाने दिलेल्या दुचाकी धडकेत वृद्धाचा मृत्यू

वृद्धाचा अपघाती मृत्यू; अल्पवयीन आरोपीवर ‘बीएनएस’ आणि ‘एमव्ही ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल

कुपवाड, १८ नोव्हेंबर : औधोगिक वसाहत कुपवाड येथे राजधानी कारखान्याजवळ रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात शंकर दगडू मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शंकर मोरे हे रविवार (ता.१६) रोजी रात्री साडे आठ ते सव्वा नऊच्या दरम्यान कामावरून घरी परतत असताना, एक अल्पवयीन मुलगा साहिल गायकवाड याने भरधाव वेग असलेल्या मोटारसायकलने धडक दिली, या धडकेत शंकर मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात अल्पवयीन साहिल प्रमोद गायकवाड (वय १७ वर्षे, ९ महिने, रा. सावळी, कुपवाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत शंकर मोरे यांचा मुलगा निलेश शंकर मोरे (वय ३७, रिक्षा चालक, संजय नगर, सांगली) यांनी कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली.

पोलिसांची अधिक माहिती अशी की, फिर्यादी निलेश शंकर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील शंकर दगडू मोरे हे (ता.१६) रोजी रात्री ८:३० ते ९:१५ च्या सुमारास आपले कामावरून घरी परतत असताना विना नंबर प्लेटच्या दुचाकीने येत असलेल्या साहील गायकवाडने राजधानी कारखान्याजवळ रोडवर साहिलने शंकर मोरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे शंकर मोरे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचावर रुग्णलयात उपचार चालू होते. शंकर मोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद (ता.१८) रोजी रात्री ७ वाजून ५६ मिनिटांनी कुपवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अल्पवयीन साहिलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कुपवाड प्रभारी अधिकारी सपोनिआनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय डी. जाधव हे करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button