सांगली: मध्यवर्ती कारागृहातून पळालेला खुनाचा आरोपी मिरज पोलिसांच्या ताब्यात;

जयसिंगपूरमधून केली अटक

सांगली, १७ नोव्हेंबर : सांगली मध्यवर्ती कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजय दावीद भोसले हा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पळून गेला होता. मिरज शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने संसयितास पकडले आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना आणि मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शिपाई दीपक परीट हे उदगाव (जयसिंगपूर) बसस्थानक परिसरातुन मोठ्या धैर्याने आरोपीला एकट्याने पकडले. पोलिसांनी अजय भोसले याची आवश्यक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button