नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उरुण- इस्लामपूरमधून दाखल

उरुण-इस्लामपूर, १७ नोव्हेंबर : उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, श्री. विश्वनाथ रामचंद्र डांगे (बापू) यांनी महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज आज (ता.१७) रोजी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत एकजूट दाखवली.

“आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याने आम्ही महायुती म्हणून एकत्र आलो आहोत. उरुण-इस्लामपूरचे उज्वल भविष्य घडवण्याचा आम्ही निर्धार केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-अपेक्षा लक्षात घेऊन, विकासाच्या वाटेवर उरुण-इस्लामपूरला आणखी पुढे नेणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे.” ————नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे महायुती——–

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या सोहळ्याला महायुतीचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख (भाऊ), माजी आमदार भगवानराव साळुंखे (आप्पा), ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील (आप्पा), भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राहुल महाडिक, माजी नगराध्यक्ष चिमण भाऊ डांगे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील (आबा), माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे (आण्णा), विक्रम पाटील तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button