नागरिकांना हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी १८ ते २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत; महानगरपालिका निवडणूक २०२५ — सदस्य पदाच्या प्रभागनिहाय आरक्षणास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

सांगली, १६ नोव्हेबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सदस्य पदाच्या प्रभागनिहाय आरक्षणास अखेर राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला होता, त्यास मंजुरी देत पुढील प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश महानगरपालिकेला मिळाले आहेत.

आता नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मंजूर प्रभागनिहाय आरक्षण यादी आता प्रसिध्द करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.

हरकती/सूचना सादर करण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) आहे.

नागरिकांनी आपल्या हरकती/सूचना निर्धारित मुदतीत योग्य नमुन्यात खालील कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष सादर कराव्यात. महानगरपालिका निवडणूक कार्यालय (मुख्यालय) प्रभाग समिती कार्यालय क्र. १ प्रभाग समिती कार्यालय

क्र. २ प्रभाग समिती कार्यालय

क्र. ३ प्रभाग समिती कार्यालय

क्र. ४ पारदर्शकता आणि सक्रिय सहभागाचे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त मा. सत्यम गांधी यांनी नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

“प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या कायदेशीर तरतुदी व मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत काटेकोर, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग ही प्रक्रियेची सर्वात महत्त्वपूर्ण बाजू आहे.”“प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांचा नियमबद्धरीत्या विचार करून अंतिम आरक्षणाचा अहवाल वेळेत राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाईल,” ————————–आयुक्त सत्यम गांधी ————

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button