दलित महासंघ जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते खून प्रकारणातील आरोपींची धिंड ; गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

सांगली, १५ नोव्हेंबर : येथील दलित महासंघाचे जिल्हाअध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसादिवशी निघृण खून करणाऱ्या संसयित आरोपी गणेश मोरे, सतीश लोखंडे, अजय घाडगे व योगेश शिंदे यांची सांगली पोलिसांनी आज शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी राहत्या ठिकाण्यापासून व खून झालेल्या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही ‘धिंड’ काढण्याची कठोर भूमिका घेतली.

सदर घटना ही वर्चस्ववादातून झाली असून या दुहेरी हत्याकांडात उत्तम मोहिते आणि हल्लेखोर शाहरुख शेख यांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींची धिंड काढली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांना चाफ बसणार आहे. पोलिसांनी आरोपी गणेश मोरे आणि इतर साथीदारांना बेड्या ठोकून, गारपीर चौक परिसरात खून झाला, त्या संपूर्ण परिसरातून चालवत नेले. पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन केली जाणार नाही. दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button