पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते काळी खण सुशोभीकरण प्रकल्पाचे भव्य लोकार्पण

सांगली, १५ नोव्हेंबर : सांगली शहरातील नव्या रूपाने सुशोभीत करण्यात आलेल्या काळ्या खणीचे आज शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या जिल्हाचे पालकांमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहत पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, मनपा आयुक्त सत्यम गांधी, लोकप्रतिनिधी, अधिकारीवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन टप्प्यांत प्रकल्पाचे आधुनिकी करणकाळी खण परिसरातील सुशोभीकरणाची कामे दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांत पूर्ण करण्यात आली आहेत. या आधुनिक व सौंदर्यवर्धनामुळे काळी खण आता सांगलीकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ ठरणार आहे.

१ – कँटीलीव्हर डेक, चेन लिंक बांधणी, स्टील रेलिंग, लँडस्केपिंग, वृक्षारोपण, इलेक्ट्रिफिकेशन. रु. १,०५,५७,७३२/-टप्पा

२ – R.C.C. रिटेनिंग वॉल, कंपाऊंड वॉल, फूड स्टॉल्स, ग्रॅनाइट फ्लोरिंग, ग्लास रेलिंग, म्युझिकल फाउंटेन आणि लेसर शो, व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टम.रु. ४,४२,९८,०२०/-दोन्ही टप्प्यांतील कामे पूर्ण झाल्यामुळे हा परिसर आता मनोरंजन, फिरण्यासाठी हरित जागा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त केंद्र म्हणून विकसित झाला आहे.’

“काळी खणचा बदल हा सांगली शहराच्या स्मार्ट आणि आधुनिक विकासाचे प्रतीक आहे. फाउंटेन, लेसर शो आणि सुबक बांधकामामुळे हे ठिकाण सांगलीचे नवे पर्यटन आकर्षण ठरेल. अशा प्रकल्पांमुळे शहराची ओळख आणि सौंदर्य अधोरेखित होते. —पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील —

“सुशोभीकरण हा केवळ देखाव्यासाठी नसून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी सार्वजनिक सेवा मिळावी यासाठी प्रशासनाचा हा प्रयत्न आहे.”–महापालिका आयुक्त सत्यम गांधी —

या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, अधिकारीवर्ग आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button