मिरज शहरात वाहतुकीत मोठा बदल; किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

सांगली, १५ नोव्हेंबर : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व वाहतूक नियंत्रण पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मिरजेतील किल्ला भाग मा. न्यायाधीश निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकापर्यंत एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराणा प्रताप चौक ते किल्ला भाग जाणाऱ्या रोडवर तहसिल कार्यालय, युनियन बँक, आदर्श विद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू आहे. शहरातील वाहतूक सुरळीतपणे विनाअपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील किल्ला भाग मिरज मा. न्यायाधीश यांचे निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकाकडे येणारा दक्षिण-उत्तर रस्ता दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना एकेरी वाहतूक (वन-वे) करणे आवश्यक आहे. दररोज होणाऱ्या किरकोळ अपघातास आळा बसण्यासाठी सदर भागातून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांनी, वाहनधारकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पुढीलप्रमाणे सर्व वाहनांना वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग कायमस्वरुपी करण्याबाबतचा हा जाहिरनामा निर्देशित करण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किल्ला भाग ते मा. न्यायाधीश निवासस्थान मिरज येवून दुचाकी वाहनांखेरीज येणाऱ्या वाहनांसाठी मा. न्यायाधीश निवास्थानापासून डावीकडे पश्चिमेस वळण घेऊन जवाहर चौक मार्गे किसान चौक मार्गे मिरज शहरात येता व जाता येईल. याची अंबलबजवानी १४ नोव्हेंबर पासून कायमस्वरुपी करण्यात आली आहे. याची नोंद सर्व नागरिकांनी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button