
मुंबई/सांगली, १४ नोव्हेंबर : महाराष्ट्रमधील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी मोठा बदल जाहीर केला आहे. आयोगाने अगोदर केलेल्या प्रसिद्ध वेळापत्रकात बदल केला असून आता प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा केली आहे.
नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. वेळापत्रकातील प्रमुख बदल:अ. क्र.निवडणुकीचा टप्पासुधारित तारीखपूर्वीची तारीख (तुलना)
१. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे २०/११/२०२५, १४/११/२०२५
२. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५, २२/११/२०२५
३.प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करणे०५/१२/२०२५, ३०/११/२०२५
४.मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे०८/१२/२०२५, ०३/१२/२०२५
५.मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे १२/१२/२०२५, ०७/१२/२०२५
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व महानगरपालिका आयुक्त, विभागीय अधिकारी आणि नागरिकांनी या सुधारित कार्यक्रमाची तातडीने नोंद घ्यावी. नागरिकांनी त्यांच्या नावाचा आणि तपशिलाचा पडताळा करून, आवश्यक असल्यास हरकती/सूचना निर्धारित मुदतीत दाखल करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. मतदार यादी तयार करताना तांत्रिक अडचणी आल्यास महानगरपालिकांनी आयोगाच्या संगणकीकरण कक्षाशी संपर्क साधावा. सुधारित कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.