वारणाली हॉस्पिटल प्रकल्पाची आयुक्त सत्यम गांधींनी केली पाहणी; ऑक्सिजन प्लांटसह इंटेरियर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सांगली, १४ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या महत्त्वाकांक्षी जनकल्याणकारी प्रकल्पाला गती देण्यासाठी मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, आयुक्तांनी ऑक्सिजन प्लांटसह सर्व पायाभूत सुविधा आणि इंटेरियर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांना ऑक्सिजन प्लांट शिफ्टिंगसाठी तातडीने दर मागवून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यकारी अभियंता (विद्युत) अमर चव्हाण यांना हॉस्पिटलमधील सर्व विद्युत सुविधा कोणत्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करणे व हॉस्पिटलच्या इंटेरियर आणि फर्निचरची कामे येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यावर भर देण्यास संबंधित कंत्राटदारांना सांगण्यात आले असून प्रकल्पातील इतर सर्व पायाभूत सुविधा कोणत्याही दिरंगाई शिवाय तातकाळ पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

आरोग्य सेवेच्या उन्नतीकडे निर्णायक पाऊल हा वारणाली हॉस्पिटल प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा मोठा लाभ मिळणार आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता (विद्युत) l अमर चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, तसेच शाखा अभियंते व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button