श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बुधगावतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण; लहानग्यांच्या कल्पकतेला मिळाला सन्मान!

बुधगाव,१३ नोव्हेंबर : दिवाळीच्या निमित्ताने बुधगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा निकाल सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) जाहीर करण्यात आला आणि विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेत सुमारे २० किल्ले साकारले होते.

लहानग्यांनी साकारले २० किल्ले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत बुधगावमधील लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या चिमुकल्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीतून आणि परिश्रमातून सुमारे २० आकर्षक किल्ले साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांची थ्रीडी प्रतिमा ठरली खास आकर्षण बक्षीस वितरण समारंभात सहभागी सर्व स्पर्धकांना संघटनेच्या वतीने शिल्ड आणि आकर्षक गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘थ्रीडी’ मध्ये असलेली प्रतिमा आणि शिल्ड असे अनोखे बक्षीस देण्यात आले.  स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आरव कोळी, युवराज पाटील, वैष्णवी बंडगर, आदित्य साळुंखे आणि अथर्व कोष्टी या बालकलाकारांनी बनवलेले किल्ले विशेष आकर्षक आणि उत्कृष्ट ठरले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button