भिमा-कोरेगाव सरसेनापतींच्या वंशजाचा काँग्रेस प्रवेश; “हा वारसा काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जाईल” – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई/मिरज, १३ नोव्हेंबर : मिरज तालुका विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे माजी अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार आणि कार्याध्यक्ष श्री. गंगाधर तोडकर यांनी आज (१२ नोव्हेंबर २०२५) राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन, मुंबई येथील प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार चंद्रकांत हांडोरे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमित देशमुख, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते प्रा. इनामदार आणि तोडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. प्रमोद इनामदार यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “प्रा. प्रमोद इनामदार हे भीमा-कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक यांचे थेट वंशज आहेत. त्यांचे घराणे हे लढवय्ये आणि ऐतिहासिक आहे.” त्याचबरोबर गंगाधर तोडकर यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस विचारधारेचे होते.

सपकाळ साहेब यांनी विश्वास व्यक्त केला की, “इनामदार आणि तोडकर हे दोन्ही नेते याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जातील. ते राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करतील आणि सर्व बहुजन समाजाला एकत्र करून काँग्रेसच्या विचारधारेत समाविष्ट करतील.”        

याप्रसंगी आमदार विश्वजीत कदम, सतेज उर्फ बंटी पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी नवनिर्वाचित नेत्यांचे स्वागत केले. त्यांनी प्रा. इनामदार आणि श्री. तोडकर या दोघांच्याही पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शिवराज मोरे यांनी केले, तर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनिषाताई रोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button