अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीत सांगली पोलिसांकडून वाहतूक जनजागृती

सांगली, १२ नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल आणि वाहतूक नियंत्रण शाखेने मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह विशेष वाहतूक जनजागृतीपर कार्यक्रम घेतला. मिरज शहरातील ऑक्सिजन पार्क येथे हा प्रबोधनपर कार्यक्रम ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न केल्यास जीव गमवावा लागेल, ‘हे जीवन पुन्हा नाही’, त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सयाजी शिंदे यांच्याकडून करण्यात आले.

ते खालीलप्रमाणे

१. सीट बेल्टचा वापर: चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे.

२. मोबाईलचा वापर टाळा: वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, यामुळे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता जास्त असते.

३. हेल्मेट बंधनकारक: दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा. “जर तुम्हाला डोके असेल तर हेल्मेट घालणे आवश्यक आहे,” असे मार्मिक आवाहन त्यांनी केले.

४. भरधाव वेगाला आळा: भरधाव वेगाने वाहन चालवू नका. “अती गती जीव घेऊ शकते, गाडी हळू चालवा, जिवंत राहा.”

५. मद्यपान टाळा: मद्यप्राशन करून वाहन चालवू नका, नशा करून वाहन चालवू नका.

पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनहा जनजागृतीपर कार्यक्रम पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (मिरज) प्रणिल गिल्डा आणि उप विभागीय पोलीस अधिकारी (तासगाव) अशोक भवड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी वाहतूक नियंत्रण शाखा, मिरजकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि त्यांच्याकडील स्टाफ तसेच वाहतूक नियंत्रण शाखा, तासगावचे पोलीस उपनिरीक्षक अकिब काझी व त्यांच्याकडील स्टाफ उपस्थित होता. अपघातांना आळा बसावा यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button