राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सांगलीत ‘युनिटी मार्च’; सरदार पटेलांची १५० वी जयंती साजरी

सांगली, १० नोव्हेंबर : ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) या भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यात दोन जिल्हास्तरीय ‘युनिटी मार्च/पदयात्रां’चे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची २५ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वी जयंती आहे.

या निमित्ताने ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. याच अनुषंगाने सांगली जिल्ह्यातही या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पदयात्रेचे ठिकाण आणि वेळापत्रक:

सांगली येथे शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५. वेळ: सकाळी ७.३० वाजता. मार्ग : तरुण भारत स्टेडियम, सांगली येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे समारोप.

उरूण-ईश्वरपूर येथे शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५. सकाळी ७.३० वाजता. मार्ग: क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, उरूण-ईश्वरपूर पर्यंत. मेरा युवा भारत, सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, हा कार्यक्रम आणि उपक्रम ‘माय भारत’ पोर्टलवर (MY Bharat Portal) होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या पोर्टलवर नोंदणी करून या ऐतिहासिक उपक्रमात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पदयात्रेसोबत अन्य उपक्रम:या पदयात्रेदरम्यान केवळ ‘युनिटी मार्च’ (Unity March) नसून, त्यासोबत विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, स्वच्छता मोहीम व्यसनमुक्ती मोहीम सरदार पटेल यांच्या विचारांवर चर्चासत्रे वादविवाद स्पर्धा या उपक्रमात जिल्हा प्रशासन, माय भारत, शाळा-महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स यांचा सक्रिय सहभाग असेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button