विटा अग्निकांडात चार जणांच्या मृत्यूची घटना मन सुन्न करणारी – खासदार विशाल पाटील

खासदार विशाल पाटील यांनी घेतली घटनास्थळाला भेट; तातडीने मदतीच्या सूचना

विटा, दि. १० नोव्हेंबर (वृत्तसेवा):विटा (ता. खानापूर) येथील जय हनुमान स्टील सेंटरला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी घटना आहे, अशा शब्दांत खासदार विशाल पाटील यांनी दुःख व्यक्त केले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच, खासदार विशाल पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची गंभीरतेने पाहणी केली. त्यांनी स्थानिक प्रशासन, बचाव पथक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा सविस्तर अहवाल घेतला. या कठीण प्रसंगी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांप्रती खासदार विशाल पाटील यांनी सहवेदना व्यक्त केली. त्यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत आणि शासकीय स्तरावर पाठपुरावा तातडीने होईल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button